Tanveer Sangha : कोण आहे तनवीर संघा? कुटुंब मूळचे भारतीय, वडील चालवायचे टॅक्सी

2 Min Read
Tanveer Sangha Australia VS India Semi Final 2025

Tanveer Sangha Australia VS India Semi Final 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये जोरदार लढत सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताच्या फलंदाजांना अडवण्यासाठी मोठा बदल केला आहे. त्यांनी भारतीय वंशाच्या लेग-स्पिनर तनवीर संघाला (Tanveer Sangha) अंतिम संघात स्थान दिले आहे.

कोण आहे तनवीर संघा?

Who is Tanveer Sangha : तनवीर संघाचा जन्म ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झाला. मात्र, त्याचे कुटुंब मूळचे पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील रहीमपूर गावचे आहे. त्यांचे वडील जोगा संघा 1997 मध्ये ऑस्ट्रेलियात गेले आणि तिथे टॅक्सी चालक म्हणून काम सुरू केले. तनवीरच्या कुटुंबात कोणालाही क्रिकेटची आवड नव्हती. मात्र, जोगा यांनी आपल्या मुलाला 10 व्या वर्षी क्रिकेट क्लबमध्ये दाखल केले. त्यानंतर तनवीरने मागे वळून पाहिले नाही.

ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याची संधी

तनवीर संघाने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने ऑस्ट्रेलियासाठी 3 वनडे आणि 7 टी-20 सामने खेळले आहेत.

🔴 हेही वाचा 👉 भारताने सलग 14 वा टॉस गमावला; पण नोंदले गेले अनेक मोठे विक्रम.

सेमीफायनलमध्ये संघाचा का समावेश?

ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने दुबईच्या फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर तनवीर संघाला संघात घेतले आहे. त्यांच्यासोबत अॅडम झॅम्पा देखील फिरकी आक्रमणाची जबाबदारी सांभाळत आहे. ऑस्ट्रेलियाने तनवीरला संधी देऊन भारताविरुद्ध नवा डाव टाकला आहे.

🔴 हेही वाचा 👉 शुभमन गिलच्या कॅचवर वाद, अंपायरने दिली चेतावणी!.

सोशल मीडियावर ट्रेंडिंग

तनवीर संघा हा आता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनला आहे. चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ त्याच्या निवडीबद्दल विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही जण म्हणत आहेत की, भारताच्या फलंदाजांना फिरकी खेळायची सवय आहे, त्यामुळे तनवीर संघाचा फारसा प्रभाव पडणार नाही. तर काहींना वाटते की, तो ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

🔴 हेही वाचा 👉 ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या यशाचा पंजाबमध्ये जल्लोष.

भारताविरुद्ध प्रभाव पाडणार?

भारताचे फलंदाज फिरकीविरुद्ध उत्तम फलंदाजी करतात, त्यामुळे तनवीर संघा (Tanveer Sangha) भारतीय संघासाठी अडचण ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाने या निवडीद्वारे धोका पत्करला आहे, ऑस्ट्रेलियाचा हा डाव यशस्वी होतो का, हे आता लवकरच स्पष्ट होईल.

🔴 व्हिडीओ 👉 कुलदीप यादवची चूक, रोहित-कोहली संतापले! व्हिडीओ व्हायरल.

Share This Article