Shubman Gill Father Video: शुभमन गिलच्या वडिलांचा ऋषभ पंतसोबत भांगडा; व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

2 Min Read
Shubman Gill Father Bhangra With Rishabh Pant Video Viral

Shubman Gill Father Bhangra With Rishabh Pant Video Viral : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकताच संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यानंतर खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. याच वेळी शुभमन गिलचे वडील (Shubman Gill Father) लखविंदर गिल आणि विकेटकीपर ऋषभ पंत यांनी भांगडा करत आनंद व्यक्त केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

पंतला खेळण्याची संधी मिळाली नाही, पण उत्सवात सहभागी

भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याला स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, कारण केएल राहुलने पाचही सामन्यांत विकेटकीपिंग केली. मात्र, संघाच्या विजयाचा आनंद घेताना तो दिसला. BCCI ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पंत आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांनी गिलच्या वडिलांसोबत भांगडा केला.

🔹 रोहित शर्माच्या नेतृत्वाचे शुभमन गिलकडून कौतुक

शुभमन गिलने चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपला प्रवास 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध शतकाने सुरू केला होता, मात्र त्यानंतरच्या चार डावांत त्याला मोठी खेळी करता आली नाही. विजयाबाबत बोलताना गिल म्हणाला –  

“अद्भुत अनुभव होता. बहुतेक वेळा मी बसून रोहित भाईची बॅटिंग एन्जॉय करत होतो. त्यांनी मला सांगितले होते की स्कोअरबोर्डकडे पाहू नकोस, शेवटपर्यंत टिकून राहायच आहे.”

तसेच, गिलने न्यूझीलंडच्या संघाच्या संघटनात्मक खेळ आणि सातत्यपूर्ण प्रदर्शनाचे कौतुक केले.  

https://twitter.com/ShubmanGill7fc/status/1898926157745078750

🔹 रोहित शर्मा निवृत्ती घेणार?

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या निवृत्तीबद्दल चर्चांना उधाण आले असताना त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले –  

“भविष्यासाठी आत्ताच कोणतीही योजना केलेली नाही. सध्या जसे चालू आहे, तसे चालू राहील. आणि हो, मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत नाहीये, त्यामुळे कोणीही अफवा पसरवू नये.” 

🔴 हेही वाचा 👉 सर्वाधिक धावा, सर्वाधिक बळी… तरीही न्यूझीलंडला मिळू शकले नाही जेतेपद.

Share This Article