Rohit Sharma Net Worth 2025: गरीबीतून सुरु झाला प्रवास, आज आहे करोडोंचा मालक

3 Min Read
Rohit Sharma Net Worth Income IPL Salary Assets

Rohit Sharma Net Worth 2025 : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नाही, तर कमाईच्या बाबतीतही टॉप क्रिकेटर्सपैकी एक आहे. त्याच्या आयुष्याचा प्रवास सामान्य कुटुंबातून सुरु झाला व तो क्रिकेटच्या शिखरापर्यंत पोहोचला. आज त्याची एकूण संपत्ती (Net Worth) सुमारे 215 कोटी रुपये आहे.

BCCI वेतन आणि मॅच फी

बीसीसीआयच्या ग्रेड A+ करारामुळे रोहित शर्माला दरवर्षी ₹7 कोटी वेतन मिळते. याशिवाय तो प्रत्येक सामन्यासाठी वेगवेगळे मानधन घेतो:

  • टेस्ट सामना – ₹15 लाख  
  • वनडे सामना – ₹6 लाख  
  • T20 सामना – ₹3 लाख  

IPL मधील कमाई

रोहित शर्मा याचे नाव IPL मधील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये घेतले जाते. त्यांने मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे. IPL 2024 मध्ये कर्णधारपद गमावले असले तरी, तो संघातील महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. मुंबई इंडियन्स त्याला ₹16.3 कोटी प्रति हंगाम वेतन देते. त्याच्या IPL करिअरमधून त्यांन आतापर्यंत ₹194.6 कोटींपेक्षा जास्त कमावले आहेत.

ब्रँड एंडोर्समेंटमधून मोठी कमाई

रोहित शर्मा अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे अँबेसेडर आहे, जसे की Adidas, Oakley, La Liga, Dream11 इत्यादी. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी तो ₹3.5 ते ₹7 कोटी घेतो . आतापर्यंत त्यान 24 पेक्षा जास्त ब्रँड्ससाठी काम केल आहे.

लक्झरी कार्स आणि आलिशान घर

रोहित शर्माला महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्याच्या गॅरेजमध्ये काही टॉप लक्झरी कार्स आहेत:  

  • BMW X3
  • Mercedes GLS 400D  
  • Toyota Fortuner

तसेच, मुंबईतील वर्ली येथे त्याचे समुद्रकिनारी 30 कोटींचे आलिशान घर आहे, जे 6,000 स्क्वेअर फूट परिसरात आहे. 

🔴 हेही वाचा 👉 Ravi Shastri Net Worth 2025: किती संपत्तीचे मालक आहेत रवि शास्त्री? त्यांची कमाई जाणून व्हाल थक्क.

रोहित शर्मा याची IPL कामगिरी

  • 5 वेळा IPL विजेता कर्णधार (2013, 2015, 2017, 2019, 2020)  
  • 200+ IPL सामने खेळले  
  • 6000+ IPL धावा – सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक  
  • 1 IPL हॅटट्रिक – 2009 मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी घेतली  
  • 40+ अर्धशतके – सतत उत्कृष्ट प्रदर्शन करणारा फलंदाज  

गरीबीतून प्रवास सुरू केलेल्या रोहित शर्माने क्रिकेटच्या जोरावर करोडोंचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. त्याची संपत्ती, ब्रँड व्हॅल्यू आणि क्रिकेटमधील यश पाहता तो भारताच्या सर्वात श्रीमंत आणि यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

🔴 हेही वाचा 👉 Rishabh Pant Net Worth 2025: ऋषभ पंतची एकूण संपत्ती किती? घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!.

Share This Article