Rohit Sharma Controversy : ‘या’ नेत्याने केली रोहित शर्माला संघातून वगळण्याची मागणी

2 Min Read
रोहित शर्मा - फोटो : पीटीआई

Rohit Sharma Captaincy Debate ICC Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कामगिरीवर राजकीय वर्तुळात टीकेची लाट उसळली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांच्या वक्तव्यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय (Saugata Roy) यांनी देखील रोहितच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

सौगत रॉय यांचे रोहितवर टीकास्त्र

रॉय यांनी ANI शी बोलताना म्हटले, “रोहित शर्मा आता संघात असायलाच नको. किती दिवस त्याला वाव दिला जाणार? दोन वर्षांत एकदाच शतक ठोकून इतर सामन्यांत लवकर बाद होणे, हे संघात राहण्यास पुरेसे कारण नाही. त्याने आता संघावर अधिराज्य गाजवू नये.”

“रोहित फिट नाही, त्याची जागा इतरांना मिळावी”

रॉय यांनी रोहितच्या फिटनेसवरही भाष्य केले, ते म्हणाले, “होय, तो जाड आहे. पण लोक त्याबाबत बोलत नाहीत. चांगला फिटनेस असलेला आणि चांगली कामगिरी करणारा खेळाडू कर्णधार असायला हवा. जसप्रीत बुमराह हा फिट असल्यास उत्तम कर्णधार ठरू शकतो. श्रेयस अय्यर देखील एक चांगला पर्याय आहे.” अस ते म्हणाले.

शमा मोहम्मद यांचे वादग्रस्त विधान

Rohit Sharma Controversy : यापूर्वी शमा मोहम्मद यांनी रोहितवर टीका करताना लिहिले होते, “रोहित शर्मा हा एक खेळाडू म्हणून खूप जाड आहे. त्याने वजन कमी करावे. शिवाय तो भारताचा सर्वांत निष्क्रिय कर्णधार आहे.” मात्र, वाद वाढल्यावर त्यांनी आपले ट्विट डिलीट केले. मात्र, काँग्रेसने शमा मोहम्मद यांच्या विधानापासून स्वतःला वेगळे केले आणि शमा मोहम्मद यांना भविष्यात अधिक काळजीपूर्वक वक्तव्य करण्याचा सल्ला दिला.

🔴 हेही वाचा 👉 Who Is Shama Mohamed.

रोहितची कामगिरी आणि संघातील स्थानावर वाद

ICC Champions Trophy 2025: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध फक्त 15 धावा केल्या. संघातील इतर खेळाडू चांगली कामगिरी करत असताना रोहितवर टीका होत आहे. मात्र, चाहत्यांनी त्याच्या नेतृत्वाचा बचाव करत आकडेवारीद्वारे उत्तर दिले आहे.

भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी

भारताने न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवत गट ‘A’ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. आता मंगळवारी सेमी फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी (Ind vs Aus) होणार आहे. 

🔴 हेही वाचा 👉 देशाची प्रतिमा मलीन होते… रोहित शर्माच्या ‘फॅट-शेमिंग’ वादावर प्रशिक्षक दिनेश लाड यांची तीव्र प्रतिक्रिया.

Share This Article