Champions Trophy 2025: भारतीय संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. कर्णधार रोहित शर्मा नेतृत्व करत असताना संघाने दमदार प्रदर्शन केले आहे. मात्र, याच दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या शमा मोहम्मद यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ सुरू झाली आहे.
रोहित शर्मावर शमा मोहम्मद यांची टीका
Rohit Sharma Body Shaming Controversy Congress Leader Shama Mohammed : शमा मोहम्मद यांनी X (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की,
“रोहित शर्मा जाडा आहे, त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. त्यामुळेच तो आतापर्यंतचा सर्वात अकार्यक्षम कर्णधार आहे.”
या विधानामुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी याला “बॉडी शेमिंग” म्हणत शमा मोहम्मद यांच्यावर निशाणा साधला.
विरोध वाढताच पोस्ट डिलीट
शमा मोहम्मद यांची पोस्ट वादग्रस्त ठरली. वाढता विरोध पाहून त्यांनी ती लगेच डिलीट केली. मात्र, तोपर्यंत स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता.

BJP नेत्या राधिका खेडांची काँग्रेसवर टीका
या प्रकरणावर भाजप नेत्या राधिका खेडा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पोस्ट करत म्हटले की,
“हा तोच काँग्रेस पक्ष आहे, ज्याने दशकानुदशक खेळाडूंना अपमानित केल. आता एका महान क्रिकेटपटूची देखील ते खिल्ली उडवत आहेत.”
शमा मोहम्मद यांचे स्पष्टीकरण
वाद वाढल्यानंतर शमा मोहम्मद यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या,
“मी रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल बोलले. माझा हेतू बॉडी शेमिंग करणे नव्हता.”
मात्र, सोशल मीडियावरील टीका थांबण्याचे नावच घेत नाही. अनेक क्रिकेटप्रेमींनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
🔴 हेही वाचा 👉 कोण आहेत काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद? ज्या ‘रोहित शर्माला जाडा’ म्हणून आल्या चर्चेत!.
🔹 महत्त्वाच्या घडामोडी एका नजरेत:
✔ रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.
✔ काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी त्याच्या फिटनेसवर टीका केली.
✔ सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप, पोस्ट व्हायरल.
✔ BJP नेत्या राधिका खेडांची काँग्रेसवर टीका.
✔ वाद वाढल्यानंतर शमा मोहम्मद यांनी पोस्ट डिलीट करत स्पष्टीकरण दिले.
🔴 हेही वाचा 👉 रोहित शर्मा ला ढोला म्हणणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्यांच्या टीकेला BCCI ने दिले सडेतोड उत्तर.
🔴 हेही वाचा 👉 ‘या’ नेत्याने केली रोहित शर्माला संघातून वगळण्याची मागणी.