Ind vs Nz Final 2025: दुबईच्या खेळपट्टीबाबत राचिन रवींद्रचे वक्तव्य, म्हणाला- ‘आम्हाला माहित नाही…’

3 Min Read
Rachin Ravindra On Dubai Pitch Champions Trophy Final Ind Vs Nz 2025 (फोटो: AP)

Rachin Ravindra on Dubai Pitch : न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू राचिन रवींद्रने दुबईच्या खेळपट्टीबाबत अनिश्चितता व्यक्त केली आहे. त्यांने सांगितल की, अंतिम सामन्यात परिस्थितीनुसार खेळणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम लढत

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs Nz) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील सर्व सामने याच मैदानावर खेळले आहेत, तर न्यूझीलंडने आपले बहुतेक सामने पाकिस्तानमध्ये खेळले असून, फक्त एक गट सामना दुबईत खेळला आहे.  

भारताला दुबईतील खेळपट्टीचा फायदा?

भारताने या स्पर्धेत दुबईत चार सामने खेळल्याने काही माजी क्रिकेटपटूंनी संघाला खेळपट्टीचा फायदा होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. पत्रकार परिषदेत गंभीर म्हणाले,

“भारताला दुबईत खेळण्याचा कोणताही अतिरिक्त फायदा झाला नाही. ही खेळपट्टी आमच्यासाठी तितकीच नवी आहे, जितकी इतर संघांसाठी आहे. आम्ही अद्याप या मैदानावर सरावही केलेला नाही. आमचा संपूर्ण सराव ICC Academy मध्ये झाला आहे.”

🔴 हेही वाचा 👉 गौतम गंभीर संतापला – ‘भारतीय संघाला कोणताही फायदा झाला नाही!’.

रचिन रवींद्रचे दुबईच्या खेळपट्टीबाबत मत 

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू राचिन रवींद्र (Rachin Ravindra) यानेही दुबईच्या खेळपट्टीबद्दल अनिश्चितता व्यक्त केली आहे. एका पत्रकार परिषदेत तो म्हणाला,  

*”आम्हाला दुबईच्या खेळपट्टीबाबत निश्चित माहिती नाही. आमच्या गट सामन्यात (भारताविरुद्ध) चेंडू वळत होता, मात्र काही दिवसांपूर्वी तेवढा टर्न नव्हता. त्यामुळे परिस्थितीनुसार खेळणे महत्त्वाचे ठरेल, जे अंतिम सामन्यातही करावे लागेल.”

“आम्ही पुढील काही दिवसांत परिस्थितीचा अंदाज घेऊ आणि आशा आहे की, फायनलसाठी एक चांगली खेळपट्टी मिळेल,” अस तो म्हणाला.  

राचिन रवींद्रची अष्टपैलू कामगिरी

राचिन रवींद्रने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जबरदस्त खेळी करत 108 धावांची शानदार खेळी केली आणि न्यूझीलंडला 362 धावांचा मोठा स्कोअर उभारण्यास मदत केली. याशिवाय, गोलंदाजीतही आपली कमाल दाखवत त्याने 5 षटकांत फक्त 20 धावा देत 1 विकेट घेतली.

🔴 हेही वाचा 👉 डेविड मिलरचा ICC वर संताप! ICC न केलाय घोळ? म्हणून हरली दक्षिण आफ्रिका.

अंतिम सामना

न्यूझीलंडसाठी ही खेळपट्टी नवी असली तरी, संघाला परिस्थितीनुसार खेळण्याचा अनुभव आहे. तर, भारतीय संघाने याच मैदानावर सामने खेळले असले तरी त्याचा फारसा फायदा होईल असे वाटत नाही. त्यामुळे रविवारच्या फायनलमध्ये कोणता संघ परिस्थितीचा अधिक चांगला फायदा घेतो यावर विजय अवलंबून असेल.

Share This Article