Mohammed Shami Viral Photo: ‘देश से बडा कोई धर्म नही’ मोहम्मद शमीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

3 Min Read
Mohammed Shami Viral Photo Champions Trophy 2025

Mohammed Shami Viral Photo Champions Trophy 2025 : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या सेमी फायनलमध्ये (Ind vs Aus) ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या. मात्र, सध्या शमीच्या कामगिरीपेक्षा एका फोटोची अधिक चर्चा आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि त्यावर चाहते विशेष प्रतिक्रिया देत आहेत.

शमीच्या एका फोटोने जिंकली चाहत्यांची मन

Mohammed Shami Viral News : ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धक्का देणाऱ्या मोहम्मद शमीचा एक फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या फोटोमध्ये शमी बॉण्ड्रीजवळ उभा राहून एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. प्रथमदर्शनी हा एक साधा फोटो वाटत असला, तरी यामागे मोठे कारण आहे.

X @satya_AmitSingh

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 Mohammed Shami Roza Controversy: मोहम्मद शमी आहे मोठा गुन्हेगार! रोजा प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल.

रमजानच्या काळात उपवास न ठेवण्याचा निर्णय

मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा मुस्लिम धर्मीय असून सध्या रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात सूर्योदय ते सूर्यास्त कोणतेही अन्न अथवा पाणी घेतले जात नाही. मात्र, शमीने आपल्या देशासाठी खेळण्यास प्राधान्य दिले. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करावा लागणार असल्याची त्याला पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच त्याने उपवास न ठेवता शारीरिक ताकद टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला.  

🔴 हेही वाचा 👉 गौतम गंभीर संतापला – ‘भारतीय संघाला कोणताही फायदा झाला नाही!’.

सोशल मीडियावर चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद

शमीच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. अनेकांनी हा फोटो शेअर करत त्याला खरी देशभक्ती म्हटले आहे. “धर्माऐवजी देशाला प्राधान्य देण हीच खरी देशभक्ती,” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. काहींनी लिहिले आहे की, “राष्ट्रीय कर्तव्य सर्वप्रथम असते, शमीने त्याचे उत्तम उदाहरण दिले.”

🔴 हेही वाचा 👉 Virat Kohli New Record: विराट कोहलीचा नवा विक्रम! सचिन तेंडुलकरलाही टाकल मागे, वनडे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी.

शमीची अप्रतिम गोलंदाजी

या सामन्यात शमीने 10 षटकांचा पूर्ण स्पेल टाकत केवळ 3 विकेट्स घेतल्या नाहीत, तर भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीने भारताला फायनलमध्ये (Champions Trophy 2025 Final) प्रवेश मिळवून दिला. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत शमी भारतीय संघासाठी हुकमी एक्का ठरत आहे.

मोहम्मद शमीने आपल्या निर्णयाने आणि खेळाने लाखो चाहत्यांची मन जिंकली आहेत. त्याचा हा फोटो (Mohammed Shami Viral Photo) केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर चर्चेत आहे. त्याच्या देशप्रेमाने आणि उत्कृष्ट गोलंदाजीने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

🔴 हेही वाचा 👉 स्टीव्ह स्मिथचा वनडे क्रिकेटला अलविदा, विराट कोहलीसोबत….

Share This Article