Mohammed Shami Roja Controversy : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना त्याचा एनर्जी ड्रिंक पितानाचा फोटो व्हायरल झाला, ज्यावर मौलाना शहाबुद्दीन यांनी मोठा आक्षेप घेतला आणि शमीला “गुन्हेगार” ठरवले. मात्र, काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद (Shama Mohammed) यांनी या वादात उडी घेत शमीची बाजू घेतली आहे.
नेमका काय आहे मोहम्मद शमी वाद?
Mohammed Shami News: रमजानच्या महिन्यात उपवास (रोजा) ठेवणे अनिवार्य असल्याचे मौलाना शहाबुद्दीन यांनी सांगितले आणि शमीने रोजा न ठेवल्याने त्याला “गुन्हेगार” म्हटले. त्यांनी म्हटले की, “रमजान पवित्र महिना आहे, यामध्ये रोजा ठेवणे बंधनकारक आहे. शमीने रोजा न ठेवून मोठी चूक केली आहे.”
🔴 येथे जाणून घ्या नेमकं काय घडलं? 👉 मोहम्मद शमीला मौलानांनी ठरवल गुन्हेगार, भावान दिल सडेतोड उत्तर.
शमा मोहम्मद शमीच्या समर्थनार्थ म्हणाल्या…
Mohammed Shami Roza Controversy Shama Mohammed Statement: शमीच्या समर्थनार्थ शमा मोहम्मद म्हणाल्या, “इस्लाम हा वैज्ञानिक विचारधारेचा धर्म आहे. इस्लाममध्ये कर्माला प्राधान्य दिले जाते. जर एखादी व्यक्ती प्रवास करत असेल तर रोजा न ठेवण्याची मुभा आहे. शमी सध्या भारतात नाही, तो प्रवासात आहे आणि खेळत आहे. मैदानात खेळताना शरीराला उष्णता आणि थकवा जाणवतो, अशावेळी रोजा ठेवण्याचा कोणताही सक्तीचा नियम नाही.”
रोहित शर्मावर टीका करणाऱ्या शमा आता शमीच्या बाजूने?
याआधी शमा मोहम्मद यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) वजनावर टीका केली होती, त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. मात्र, शमीच्या बाबतीत त्यांनी वेगळी भूमिका घेतली असून, त्याच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर होणारे ट्रोलिंग थांबेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 Hasin Jahan Net Worth: शमीपासून वेगळी झालेली हसीन जहां कोट्यधीश, मोहम्मद शमी देतो दरमहा ‘इतके’ रुपये पोटगी.