Mohammed Shami Roza Controversy News: ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला रोजा न पाळल्यामुळे “गुन्हेगार” ठरवले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर लोक शमीच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
शमीने रोजा न पाळल्यामुळे वादग्रस्त विधान
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल सामन्यात मोहम्मद शमीने रोजा न पाळल्याच्या मुद्द्यावर मौलाना रजवी बरेलवी यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले,
रोजा पाळणे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचे धार्मिक कर्तव्य आहे. जो कोणी आरोग्य चांगले असूनही रोजा पाळत नाही, तो मोठा गुन्हेगार आहे. मोहम्मद शमी हा एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. सामन्यादरम्यान तो पाणी किंवा काही शीतपेय पिताना दिसला, तो खेळू शकत होता याचा अर्थ तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अशा परिस्थितीत त्याने रोजा न पाळणे हा इस्लामिक नियमांचा भंग आहे. त्याला याचा हिशोब अल्लाहकडे द्यावा लागेल.”
वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया
Mohammed Shami Roza Controversy In Marathi: मौलाना रजवी बरेलवी यांच्या विधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आणि धर्मगुरूंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एनसीपी नेते रोहित पवार म्हणाले,
मोहम्मद शमी हा कट्टर भारतीय आहे आणि त्याने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. धर्म आणि क्रिकेट वेगळे ठेवायला हवे.”
शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास यांनी देखील मौलानाच्या वक्तव्याची निंदा करताना सांगितले,
“ही लोकप्रियतेसाठी दिलेली प्रतिक्रिया आहे. प्रत्येक मुसलमानाला कधी काय करावे हे माहिती आहे.”
🔴 हेही वाचा 👉 Mohammed Shami Net Worth 2025: किती संपत्तीचा मालक आहे मोहम्मद शमी? जाणून घ्या त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलबद्दल.
शमीच्या कामगिरीने भारत फायनलमध्ये
मोहम्मद शमीने सेमीफायनल सामन्यात भारतासाठी महत्वाची कामगिरी बजावली. 10 षटकांत 48 धावा देऊन 3 बळी घेतले. त्याने स्टीव्ह स्मिथला बोल्ड करून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
🔴 हेही वाचा 👉 Virat Kohli Net Worth 2025: किती आहे विराट कोहलीची एकूण संपत्ती? मुंबईत 34 कोटीच लक्झरी घर, 80 कोटीचा विला ते लक्झरी कार कलेक्शन.