IND vs AUS: मोहम्मद शमीला मौलानांनी ठरवल गुन्हेगार, भावान दिल सडेतोड उत्तर!

3 Min Read
Mohammed Shami Roza Controversy India vs Australia

IND vs AUS: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) रोजा न ठेवता सामना खेळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रजवी यांनी शमीच्या मैदानात सरबत पिण्यावर आक्षेप घेतला. मात्र, शमीचा भाऊ डॉ. मुमताज (Dr. Mumtaz) यांनी या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मोहम्मद शमीच्या रोजा न करण्यावर वाद, मौलानांची नाराजी

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) च्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) उपांत्य सामन्यात मोहम्मद शमी सामना सुरू असताना सरबत पिताना दिसला. रमजान महिन्यात दिवसभर निर्जळी उपवास (Roza) ठेवण्याची मुस्लिम परंपरा असते. मात्र, शमीने रोजा न ठेवता मैदानात एनर्जी ड्रिंक पिल्याने काही लोकांनी त्याच्यावर टीका केली. सोशल मीडियावरही शमीला ट्रोल करण्यात येत आहे.  

डॉ. मुमताज यांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

मोहम्मद शमीवर टीका होत असताना शमीचा भाऊ डॉ. मुमताज त्याच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. एएनआयशी बोलताना मुमताज म्हणाले,   

“शमी देशासाठी खेळतोय. पाकिस्तानचेही अनेक खेळाडू सामना असताना रोजा ठेवत नाहीत. दुबईतील उष्णतेत 10 षटक वेगवान गोलंदाजी करणे सोपे नाही. ट्रोल करणाऱ्यांनी आधी तिथे उभ राहून दाखवाव!”  

“एनर्जी ड्रिंकशिवाय खेळाडूंना खेळणे शक्य नाही”

डॉ. मुमताज पुढे म्हणाले,

“शमी वेगाने गोलंदाजी करतो. त्यामुळे शरीराची ताकद टिकवण्यासाठी एनर्जी ड्रिंक आवश्यक आहे. रोजा न ठेवणे ही त्याची वैयक्तिक बाब आहे. जे लोक त्याला ट्रोल करत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंवर अशी टीका करणे योग्य नाही.”

“या वादाकडे लक्ष नको, अंतिम सामन्यावर फोकस कर” – शमीला भावाचा संदेश

डॉ. मुमताज यांनी शमीला संदेश देताना म्हटले,

“या वादाकडे लक्ष देऊ नको. 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यावर (Champions Trophy Final) लक्ष केंद्रित कर. तू देशासाठी खेळतोस, त्यामुळे असे निरर्थक वाद दुर्लक्षित कर.” 

📹 व्हिडीओ 👉 रोहित शर्माने केली हार्दिकची नक्कल, जय शहांच रिएक्शन व्हायरल, पहा व्हिडीओ.

🔴 हेही वाचा 👉 Mohammed Shami Net Worth 2025: किती संपत्तीचा मालक आहे मोहम्मद शमी? जाणून घ्या त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलबद्दल.

भारत फायनलमध्ये, न्यूझीलंडशी होणार लढत

भारताने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 9 मार्च 2025 रोजी भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ Final) होणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 Mohammed Shami Viral Photo: ‘देश से बडा कोई धर्म नही’ मोहम्मद शमीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!.

Share This Article