Mohammed Shami Controversy Shoaib Akhtar Reaction Video Goes Viral: भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या वादात आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने नाक खुपसले आहे. शोएबने एक व्हिडिओ शेअर करून शमीला अप्रत्यक्ष टोला लगावला, ज्यामुळे भारतीय चाहते संतापले आहेत.
शोएब अख्तरने काय म्हणाला?
Mohammed Shami News : शोएब अख्तरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो ट्रेनिंग करताना दिसतो. या व्हिडिओसोबत त्याने लिहिले आहे –
“रोजा (Roza) साठी कोणतीही सबब ठरू शकत नाही. ती एक प्रेरणा आहे. तुम्ही या उपवासाचा चांगला फायदा करून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला सराव करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.”
शमीच्या वादाचा काय आहे विषय?
- चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शमीचा एनर्जी ड्रिंक पितानाचा फोटो व्हायरल झाला होता.
- त्यानंतर भारतामधील काही मौलानांनी शमीवर उपवास न केल्याबद्दल टीका केली.
- शमीच्या भावाने मौलानांना प्रत्युत्तर देत त्यांना धर्मग्रंथ पुन्हा वाचण्याचा सल्ला दिला.
- शमीच्या प्रशिक्षकांनी आणि काही सेलिब्रिटींनीही त्याची बाजू घेतली.
- रोहित शर्मावर टीका करणाऱ्या शमा मोहम्मद यांनी देखील शमीचे समर्थन केले आणि सांगितले की तो प्रवास करत असल्यामुळे उपवास न करण योग्य आहे.
शोएब अख्तरच्या प्रतिक्रियेमुळे वाद वाढला
शोएब अख्तरने केलेल्या या पोस्टवर भारतीय चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शमीच्या वैयक्तिक निर्णयावर भाष्य करण्याची शोएब अख्तरला काहीही गरज नव्हती, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
🔴 हेही वाचा 👉 Ind vs Nz Final हरल्यास रोहित शर्माच भवितव्य काय? जाणून घ्या विशेषज्ञांच मत.
शोएब अख्तरवर भारतीय चाहत्यांचा रोष
भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर शोएब अख्तरवर जोरदार टीका केली आहे. अनेकांनी म्हटले की, शोएबने अनावश्यकपणे शमीच्या वादात उडी घेतली आणि त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला.
शमीचे लक्ष आता Ind vs Nz फायनल
दरम्यान, मोहम्मद शमी या वादात लक्ष न घालता चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलवर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. भारतीय संघाला मोठ्या सामन्यात त्याच्या दमदार कामगिरीची आवश्यकता आहे, आणि शमी याच गोष्टीवर लक्ष देत आहे.
🔴 हेही वाचा 👉 स्टीव स्मिथ आणि ग्लेन फिलिप्स सोबत हा भारतीय स्टारही शर्यतीत, कोण ठरणार विजेता?.