Mohammed Shami: टीम इंडियाच्या शॅम्पेन सेलिब्रेशनवेळी मोहम्मद शमी बाजूला का उभा राहिला?

2 Min Read
Mohammed Shami Champagne Celebration Team India (Image Credit: सोशल मीडिया)

Mohammed Shami Champagne Celebration: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर टीम इंडियाने जल्लोष साजरा केला. मात्र, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) शॅम्पेन सेलिब्रेशनवेळी बाजूला जाऊन उभा राहिला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शमीच्या अप्रतिम कामगिरीनंतर ऐतिहासिक क्षण

IND vs NZ Champions Trophy Final 2025: जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आणि भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारतासाठी ही आठ महिन्यांत जिंकलेली दुसरी आयसीसी ट्रॉफी ठरली. या विजयाचा आनंद साजरा करताना संपूर्ण संघाने स्टेजवर मोठ्या उत्साहात शॅम्पेन सेलिब्रेशन केल. मात्र, शमीने आपल्या धार्मिक आस्थेचा सन्मान राखत सेलिब्रेशनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाच्या शॅम्पेन सेलिब्रेशनवेळी शमी बाजूला

मोहम्मद शमीने भारतासाठी अनेक विजय मिळवून दिले आहेत. मात्र, त्याच्या वैयक्तिक निवडींवर नेहमीच चर्चा होत राहते. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान, त्याने रोजा न पाळल्यामुळे त्याच्यावर काही लोकांनी टीका केली होती. मात्र, शॅम्पेन सेलिब्रेशनवेळी तो बाजूला उभा राहिल्याचा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याच्या श्रद्धेचा सन्मान केला आहे.  

टीम इंडियाने फोडली शॅम्पेन केला जल्लोष

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केल. आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते रोहित शर्माने ट्रॉफी स्वीकारली आणि त्यानंतर संपूर्ण संघ स्टेजवर एकत्र आला. खेळाडूंनी शॅम्पेन फोडत मोठा जल्लोष केला. मात्र, शमी त्या वेळी स्टेजवर नव्हता.

https://twitter.com/biharigurl/status/1898786442668871890?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1898786442668871890%7Ctwgr%5E2f94c20b22eb7bffc0fa5b881ca97e9f4b928cc2%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-309440645473580355.ampproject.net%2F2502032353000%2Fframe.html

धार्मिक श्रद्धेमुळे शमीचा निर्णय

मुस्लिम धर्मात दारू सेवनाला हराम मानल जात, त्यामुळे अनेक खेळाडू अशा सेलिब्रेशनपासून स्वतःला दूर ठेवतात. 2022 टी-20 वर्ल्ड कपवेळी इंग्लंडच्या मोईन अली आणि आदिल रशीद यांनीही शॅम्पेन सेलिब्रेशनवेळी बाजूला उभ राहण्याचा निर्णय घेतला होता. मोहम्मद शमीनेही त्याच विचारधारेच पालन करत सेलिब्रेशनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.  

सोशल मीडियावर शमीच्या निर्णयाच कौतुक

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या श्रद्धेचा आदर केला आहे. भारताच्या ऐतिहासिक विजयाचा तो भाग असला तरी आपल्या मूल्यांशी तो ठाम राहिला, याबद्दल चाहते त्याच कौतुक करत आहेत.

🔴 हेही वाचा 👉 ICC Champions Trophy 2025 Best XI जाहीर – रोहित शर्मा ला धक्का, मोहम्मद शमी चमकला!.

Share This Article