KL Rahul On Wicketkeeping Challenges In Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक केएल राहुल (KL Rahul) याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली. मात्र, यष्टीरक्षणाची जबाबदारी त्याच्यासाठी सोपी नव्हती. एका मुलाखतीत त्याने याबाबत मोठा खुलासा केला.
यष्टीरक्षणाचा मोठा संघर्ष – 200-250 वेळा स्क्वाट्स करावे लागले!
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केएल राहुलला भारताच्या मधल्या फळीत फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याने ही जबाबदारी चोख पार पाडत शानदार प्रदर्शन केले. तसेच, विकेटकीपिंग करताना ऋषभ पंतसारख्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत संघात स्थान पक्के केले. मात्र, राहुलसाठी यष्टीरक्षण सहजसोपे नव्हते.
भारतीय फिरकी चौकडी – वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची गोलंदाजी राखण्यासाठी राहुलला मोठी मेहनत करावी लागली. सामना संपल्यानंतर जसप्रीत बुमराहची पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिने त्याला यष्टीरक्षणाबाबत विचारले असता, राहुलने मजेदार उत्तर दिले –
“मजा नाही आली, संजना! या फिरकीपटूंच्या गोलंदाजीदरम्यान मला 200-250 वेळा स्क्वाट (उठा-बशा) कराव्या लागतात.”
राहुलच्या या विधानावर सर्वांनी हशा पिकवला. त्याने पुढे सांगितले की, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांसारख्या फिरकीपटूंच्या बॉलिंग दरम्यान यष्टीरक्षण करणे अत्यंत आव्हानात्मक असते. मात्र, संघाच्या यशासाठी त्याने हा प्रयत्न प्रामाणिकपणे केला.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा अनुभव अविस्मरणीय – केएल राहुल
भारताच्या विजयाचा नायक ठरलेल्या केएल राहुलने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा अनुभव खास असल्याचे सांगितले. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले –
“माझ्यासाठी हा सर्वोत्तम अनुभव आहे. काही महिन्यांपूर्वी मी एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे संपूर्ण लक्ष आता जास्तीत जास्त ट्रॉफी जिंकण्यावर असेल. देवाने मला अशी संधी दिली की, मी संघासाठी सामना जिंकू शकलो.”
राहुल पुढे म्हणाला की, क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी नवी संधी मिळते. मेहनत, सराव आणि योग्य मानसिकता ठेवली, तर यश नक्की मिळते.
आयपीएलमध्ये केएल राहुल कोणत्या संघात?
आता केएल राहुलच पुढील लक्ष IPL 2025 वर आहे. तो दिल्ली कॅपिटल्स संघात सहभागी झाला आहे, मात्र संघाने कर्णधारपदाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. राहुल दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार का? याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
🔴 हेही वाचा 👉 हे आहेत आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक करणारे टॉप-5 फलंदाज, विराट कोहली कोणत्या स्थानी? जाणून घ्या.