Kane Williamson: केन विल्यमसनचा नवा विक्रम – आता कोहली-सचिनच्या यादीत विल्यमसनचा समावेश

1 Min Read
Kane Williamson Fastest 19000 Runs Record (फोटो: AP)

Kane Williamson Fastest 19000 Runs Record : न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगाने 19,000 धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.  

विल्यमसनने वनडेमध्ये झळकावले 15वे शतक

विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (NZ vs SA) शानदार खेळी करत 91 चेंडूत आपले 15वे वनडे शतक पूर्ण केले. त्याने 94 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 2 षटकारांसह 102 धावा केल्या. त्याला वियान मुल्डर (Wiaan Mulder) ने लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) च्या हाती झेलबाद केले.

कोहली-सचिनच्या यादीत विल्यमसनचा समावेश

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 19,000 धावा करण्याचा विक्रम विराट कोहली (Virat Kohli – 399 सामने) याच्या नावावर आहे.  
  • त्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar – 432 सामने) आणि ब्रायन लारा (Brian Lara – 433 सामने) यांचा क्रमांक लागतो.  
  • विल्यमसनने 440 डावांमध्ये हा टप्पा गाठला आणि तो न्यूझीलंडसाठी (New Zealand) हा विक्रम करणारा पहिला खेळाडू ठरला.  

🔴 हेही वाचा 👉 Most Runs In Champions Trophy 2025 : सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली ‘या’ स्थानावर.

Share This Article