IPL 2025 Alcohol Tobacco Advertisement Ban : इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेदरम्यान मद्य आणि तंबाखूच्या जाहिरातींवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) व्यवस्थापनाला पत्र लिहून स्टेडियममध्ये आणि टीव्ही प्रसारणादरम्यान अशा जाहिराती दाखवू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
सरोगेट जाहिरातींवरही निर्बंध
IPL चे चेअरमन अरुण धूमल यांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य सेवांचे महासंचालक अतुल गोयल यांनी खेळाडूंना आवाहन केले आहे की, खेळाडूंनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे मद्य किंवा तंबाखूशी संबंधित जाहिरातींमध्ये सहभागी होऊ नयेत, कारण अनेक तरुण त्यांना रोल मॉडेल म्हणून पाहतात.
IPL 2025 साठी लागू करण्यात आलेले निर्बंध:
✅ स्टेडियममध्ये मद्य आणि तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी.
✅ टीव्ही आणि डिजिटल माध्यमांवर अशा उत्पादनांच्या जाहिरातींवर निर्बंध.
✅ तंबाखू व मद्य उत्पादने विकण्यासही मनाई.
✅ खेळाडूंनी अशा जाहिरातींमध्ये सहभागी होऊ नये.
✅ प्रेक्षकांमध्ये आरोग्य जागरुकता वाढवण्यासाठी क्रिकेटर्सनी मद्य आणि तंबाखूविरोधी संदेश द्यावा.
आरोग्य मंत्रालयाची भूमिका
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या रोगांचे प्रमाण वाढत आहे, आणि मद्य व तंबाखू याचा थेट परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होतो. भारतात दरवर्षी १४ लाख लोक तंबाखूजन्य रोगांमुळे मृत्युमुखी पडतात. त्यामुळे IPL सारख्या मोठ्या स्पर्धेचा वापर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केला पाहिजे, असे सरकारचे मत आहे.
IPL 2025 च्या उद्घाटन आणि अंतिम सामन्याचे ठिकाण
- उद्घाटन आणि अंतिम सामना कोलकाता येथे होणार आहे, कारण कोलकाता नाइट रायडर्स (KKR) गतविजेता संघ आहे.
- IPL 2025 लिलावात ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला, ज्याला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना खरेदी केले.
- श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले.
🔴 हेही वाचा 👉 भारताच्या ऐतिहासिक विजयाने पाकिस्तान संतापला, ICC कडे केली तक्रार.