IND vs NZ: 25 वर्षांनंतर पुन्हा ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडणार भारत आणि न्यूझीलंड

3 Min Read
India vs New Zealand Champions Trophy 2025 Final (फोटो: AP)

Champions Trophy 2025 Final India vs New Zealand: तब्बल 25 वर्षांनंतर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) पुन्हा एकदा आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा (SA vs NZ) पराभव करून फायनलमध्ये प्रवेश मिळवला असून आता त्यांचा सामना भारताशी होणार आहे.

लाहोरमध्ये न्यूझीलंडचा धमाकेदार विजय

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने संपूर्ण ताकदीने खेळ करत दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली असून आता त्यांचा सामना 2 मार्च रोजी दुबईत होणाऱ्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाशी होणार आहे.

भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 4 विकेट्सने पराभव करत पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता न्यूझीलंडला गट फेरीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 रचिन रवींद्रने मोडला शिखर धवनचा विक्रम, बनला सर्वात कमी डावांमध्ये 5 वनडे शतक पूर्ण करणारा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज.

25 वर्षांनंतर पुन्हा भारत-न्यूझीलंड आयसीसी फायनलमध्ये

भारत आणि न्यूझीलंड यापूर्वी दोनदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत.

2000 ICC Knockout Final – न्यूझीलंडचा विजय (4 विकेट्सने)

2021 ICC World Test Championship Final – न्यूझीलंडचा विजय (8 विकेट्सने)


गेल्या वेळी भारत-न्यूझीलंड आयसीसी मर्यादित षटकांच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडले होते तेव्हा 2000 च्या ICC Knockout Trophy मध्ये न्यूझीलंडने भारताला 4 विकेट्सने हरवत पहिल्यांदा आयसीसी विजेतेपद जिंकले होते.

क्रिस कॅर्न्सच्या शतकी खेळीने 2000 फायनल सामना जिंकला 

त्या सामन्यात सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 50 षटकांत 264/6 अशी मजल मारली होती. गांगुलीने 117 धावा केल्या होत्या, तर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 69 धावांचे योगदान दिले होते. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

न्यूझीलंडच्या संघाने कर्णधार स्टीफन फ्लेमिंगच्या (Stephen Fleming) नेतृत्वाखाली हे लक्ष्य सहज पार केल. त्यावेळी क्रिस कॅर्न्सने (Chris Cairns) नाबाद 102 धावांची खेळी करत न्यूझीलंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.

त्यांनतर न्यूझीलंडला 2015 आणि 2019 क्रिकेट विश्वचषकात फायनलपर्यंत पोहोचूनही जेतेपद पटकावता आले नाही. मात्र, आता 25 वर्षांनंतर पुन्हा मर्यादित षटकांच्या ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये IND vs NZ आमने सामने आहे.

आता अंतिम सामन्यात न्यूझीलंड भारतीय संघाला कितपत टक्कर देतो, हे पाहण उत्सुकतेच ठरणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 केन विल्यमसनचा नवा विक्रम – आता कोहली-सचिनच्या यादीत विल्यमसनचा समावेश.

Share This Article