Champions Trophy 2025 : भारताचे सर्व सामने दुबईत झाल्यामुळे भारतीय संघाला फायदा होत असल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकाराने केला. मात्र, BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या दाव्याला सडेतोड उत्तर दिल आणि स्पष्ट केल की, भारतीय संघ स्वतःच्या खेळावर अवलंबून असतो, पिचवर नाही!
🇮🇳 दुबईतील झालेल्या सामन्यांमुळे भारताला फायदा? राजीव शुक्लांच सडेतोड उत्तर!
🏏 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने सुरक्षा कारणास्तव पाकिस्तान मध्ये खेळण्यास नकार दिला. त्यामुळे ICC ने भारताचे सर्व सामने दुबईत आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
✅ पाकिस्तानचे पत्रकार लाहोरमध्ये द. आफ्रिका VS न्यूझीलंड सेमीफायनलच्या वेळी राजीव शुक्लांना विचारत होते –
“भारताला दुबईत खेळण्याचा फायदा झाला का?”
💬 यावर राजीव शुक्लांनी स्पष्ट उत्तर दिल:
– “भारत पिचवर नव्हे, तर आपल्या खेळावर अवलंबून असतो.”
– “दुबईतही विविध प्रकारच्या पिचेस आहेत, त्यामुळे फायदा-तोटा हा प्रश्नच नाही.”
– “हा निर्णय ICC स्तरावर घेतला गेला, आणि हा अन्यायकारक निर्णय नाही.”
🔴 हेही वाचा 👉 Steve Smith Net Worth 2025: स्टीव स्मिथची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती!.
🏏 भारत-पाकिस्तान मालिका होणार? राजीव शुक्लांच मोठ वक्तव्य!
📢 भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेटबद्दल विचारल असता, राजीव शुक्ला म्हणाले:
– “भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होण ही गोष्ट भारत सरकारच्या परवानगीवर अवलंबून आहे.”
– “BCCI ची धोरण नेहमीच अशी आहेत की, द्विपक्षीय मालिका तटस्थ स्थळी खेळली जाणार नाही.”
– “भारत सरकारने यावर निर्णय घेतल्यावरच पुढील पाऊल उचलले जाईल.”
🔴 हेही वाचा 👉 IND vs AUS मॅचमधील व्हायरल मिस्ट्री गर्ल कोण ते समजल! जाणून घ्या संपूर्ण माहिती.