IND vs AUS: गौतम गंभीर संतापला – ‘भारतीय संघाला कोणताही फायदा झाला नाही!’

2 Min Read
Ind VS Aus Gautam Gambhir Slams Critics Over Dubai Advantage (फोटो: sports.ndtv.com)

Ind VS Aus Gautam Gambhir Slams Critics Over Dubai Advantage : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत (Champions Trophy 2025 Final) धडक मारली. या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी भारताला दुबईमध्ये खेळण्याचा फायदा मिळत असल्याच्या आरोपांवर संताप व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केल की, भारतीय संघाने दुबईच्या मैदानावर (Dubai Ground) कोणतेही सराव सत्र घेतलेले नाही.

गंभीर संतापला – ‘भारताला कोणताही फायदा झाला नाही!’

भारताने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आतापर्यंत १० पैकी ९ सामने जिंकले असून, एक सामना बरोबरीत राहिला आहे. यामुळे विरोधक भारताला दुबईच्या मैदानाचा फायदा होत असल्याचा आरोप करत आहेत. मात्र, गौतम गंभीरने या आरोपांना सडेतोड उत्तर दिल.

गंभीर म्हणाला, “भारतासाठी हे मैदान तितकच तटस्थ आहे, जितक इतर संघांसाठी. आम्ही येथे कोणताही सराव केला नाही. आम्ही फक्त ICC अकादमीवर सराव केला. आम्हाला येथे कोणत्याही विशेष सुविधा मिळाल्या नाहीत.”

🔴 व्हायरल 👉 ड्रेसिंग रूम सेलिब्रेशन व्हिडिओ व्हायरल, रोहित, कोहली, हार्दिकचा जल्लोष.

शेवटचा मोठा सामना इथे कधी खेळला गेला तेही आठवत नाही

गंभीरने पुढे म्हणाला की, भारताने फक्त परिस्थितीनुसार योग्य खेळाडूंची निवड केली. त्यांन सांगितल, _”जर आम्ही पाकिस्तानमध्ये खेळत असतो किंवा इतर ठिकाणी, तरी आमच्या टीममध्ये हेच स्पिनर असते. आम्ही स्पिनर निवडण्याचा निर्णय खेळाच्या परिस्थितीवर घेतो.

भारताची अंतिम फेरीतील वाटचाल

भारताने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४ गडी राखून विजय मिळवला आहे. आता अंतिम सामना ९ मार्चला होणार आहे. त्यामध्ये भारताची गाठ दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंड या दोन संघांपैकी एका संघाशी होईल.  

🔴 हेही वाचा 👉 15 महिन्यांपूर्वीचा घेतला बदला, रोहित-कोहलीच्या डोळ्यात पाणी ते आज आनंदाने नाचणारी टीम इंडिया.

आता पुढे ?

➡ भारत अंतिम फेरीत अजिंक्य ठरेल का?

➡ गौतम गंभीरच्या आक्रमक रणनीतीमुळे संघाला किती फायदा होईल?

➡ दुबईतील अपराजित मालिका कायम राहील का?

याचे उत्तर ९ मार्चला अंतिम सामन्यात मिळेल!

🔴 हेही वाचा 👉 भारत अंतिम फेरीत, सामना कधी कुठे आणि कुणाबरोबर होणार?.

Share This Article