IND vs AUS: 15 महिन्यांपूर्वीचा घेतला बदला, रोहित-कोहलीच्या डोळ्यात पाणी ते आज आनंदाने नाचणारी टीम इंडिया

3 Min Read
Ind VS Aus Champions Trophy 2025 Semifinal India Revenge Win

Ind VS Aus Champions Trophy 2025 Semifinal India Revenge Win : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत 19 नोव्हेंबर 2023 रोजी विश्वचषक फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला.

भारताचा दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 48.1 षटकांत 264 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ (73) आणि अ‍ॅलेक्स कॅरी (61). भारताने हे लक्ष्य 49व्या षटकातच पार केले. विराट कोहलीने 84 धावांची शानदार खेळी करत ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला. केएल राहुलच्या विजयी षटकाराने संपूर्ण स्टेडियम आनंदात नाहले.

🔴 हेही वाचा 👉 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाचा का धुव्वा उडला? स्टीव्ह स्मिथने सांगितले कारण.

रोहित-कोहलीच्या डोळ्यात पाणी ते आज आनंदाने नाचणारी टीम इंडिया

2023 च्या वनडे विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचे स्वप्न भंग केले होते. त्या दिवसाचे दुःख भारतीय संघाला आजही आठवत असेल. पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मिळवलेल्या विजयाने त्या जखमेवर मलम लावले. सामना जिंकल्यावर भारतीय खेळाडूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. बीसीसीआयने सामन्यानंतरचा ड्रेसिंग रूम व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या आनंदाने जल्लोष करताना दिसत आहेत.

🔴 व्हायरल 👉 ड्रेसिंग रूम सेलिब्रेशन व्हिडिओ व्हायरल, रोहित, कोहली, हार्दिकचा जल्लोष.

कोहली-श्रेयसची अर्धशतकी भागीदारी

भारतीय डावाची सुरुवात काहीशी संमिश्र झाली. रोहित शर्मा (28) आणि शुभमन गिल (9) वरच बाद झाले. त्यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. श्रेयसने 45 धावा केल्या. कोहलीने संयमाने फलंदाजी करत 84 धावांची शानदार खेळी केली.

🔴 हेही वाचा 👉 भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, विराट कोहलीने मोडला सचिनचा विक्रम.

भारतीय गोलंदाजांची कामगिरी कौतुकास्पद

भारतीय गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली. मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी निर्णायक वेळेस विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी काही चांगले फटके खेळले, मात्र त्यांना भारतीय गोलंदाजीसमोर जास्त काळ टिकाव धरता आला नाही.

विजयासोबत फायनलचे तिकीट

भारताच्या विजयामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा सामना न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिकेशी होईल. जर ऑस्ट्रेलिया जिंकली असती, तर फायनल लाहोरमध्ये खेळवण्यात आली असती.

🔴 हेही वाचा 👉 हार्दिक पांड्याचा 106 मीटरचा षटकार, उड्या मारू लागली जैस्मिन वालिया, व्हिडीओमुळे नात्याच्या चर्चांना उधाण.

भारताचा आत्मविश्वास

या विजयाने भारतीय संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले की ते ICC स्पर्धेत मोठ्या संघांविरुद्ध कसे प्रदर्शन करू शकतात. 2023 च्या पराभवाने हताश झालेल्या चाहत्यांसाठी हा विजय खूप मोठा आहे. आता संपूर्ण देश भारतीय संघाच्या अंतिम सामन्याची (Champions Trophy 2025 Final) उत्सुकतेने वाट पाहत आहे.

🔴 हेही वाचा 👉 भारत अंतिम फेरीत, सामना कधी कुठे आणि कुणाबरोबर होणार?.

Share This Article