IND VS AUS Champions Trophy 2025 Semi Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (4 मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची पहिली सेमीफायनल रंगणार आहे. हा थरारक सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. दुबईच्या मैदानावर हे दोन्ही संघा पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलियाची 9व्यांदा नॉकआउटमध्ये टक्कर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) दोन्ही संघ आयसीसीच्या नॉकआउट सामन्यात नवव्यांदा भिडणार आहेत. याआधी आठ वेळा हे संघ आमनेसामने आले असून, त्यात चार वेळा भारत आणि चार वेळा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. 2023 वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 गडी राखून हरवले होते. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी बदला घेण्याची मोठी संधी असणार आहे.
सामन्याचे वेळापत्रक आणि ठिकाण
- तारीख: 4 मार्च 2025
- वेळ: टॉस – दुपारी 2:00 वाजता, सामना – 2:30 वाजता
- ठिकाण: दुबई इंटरनॅशनल स्टेडियम
वनडे इतिहास
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 151 वनडे सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 71 जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 80 सामने जिंकले आहेत. आयसीसी टूर्नामेंट्समध्येही ऑस्ट्रेलियाचा थोडी वरचढ आहे.
IND vs AUS – प्लेयर्सवर नजर
भारतासाठी श्रेयस अय्यर टॉप स्कोरर
भारतातर्फे शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी या स्पर्धेत शतके झळकावली आहेत. श्रेयस अय्यरने 3 सामन्यांत 150 धावा करत आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 5-5 बळी घेतले आहेत.
बेन ड्वारशस ऑस्ट्रेलियाचा टॉप बॉलर
ऑस्ट्रेलियाने ग्रुप स्टेजमध्ये फक्त एकच पूर्ण सामना खेळला. जोश इंग्लिस 120 धावांसह ऑस्ट्रेलियाचा टॉप स्कोरर आहे. गोलंदाजीत बेन ड्वारशसने सर्वाधिक 6 बळी घेतले आहेत.
🔴 हेही वाचा 👉 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना एकतर्फी होणार! रोहित शर्माने सामन्यापूर्वीच सांगितल की….
पिच आणि हवामान अंदाज
- पिच रिपोर्ट: दुबईची पिच सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत करते, पण दुसऱ्या डावात फिरकीपटूंना अनुकूल ठरते. आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने एक सामना जिंकला, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन विजय मिळवले.
- हवामान: दुबईत आज पावसाची शक्यता नाही. तापमान 21 ते 29°C दरम्यान राहील. वारा ताशी 27 किमी वेगाने वाहणार आहे.
संभाव्य प्लेइंग-11
भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती/हर्षित राणा.
🔴 हेही वाचा 👉 भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी भारताचा संघ निश्चित.
ऑस्ट्रेलिया:
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, नाथन एलिस, बेन ड्वारशस, एडम झम्पा, तनवीर संघा, कूपर कोनोली.
🔴 हेही वाचा 👉 रोहित शर्मा’च्या फिटनेसवर टिप्पणी करणाऱ्या शमा मोहम्मद यांना युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचा खडसावून सवाल!.