ICC Rankings Updates: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 12 मार्च 2025 रोजी ताज्या क्रिकेट क्रमवारीची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी जबरदस्त कामगिरी केल्यामुळे मोठी झेप घेतली आहे. दुसरीकडे, विराट कोहली एका स्थानाने घसरला, तर कर्णधार रोहित शर्माला दोन स्थानांचा फायदा झाला आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत जडेजा टॉप-10 मध्ये
ICC च्या वनडे गोलंदाजी क्रमवारीत कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी तिन-तिन स्थानांची सुधारणा केली आहे.
- कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
- रवींद्र जडेजाने टॉप-10 मध्ये एंट्री घेत 10व्या स्थानावर झेप घेतली.
- श्रीलंकेचा महीश तीक्ष्णा अव्वल स्थानावर कायम आहे.
वनडे बॅटिंग क्रमवारीत शुभमन गिल अव्वल
भारतीय सलामीवीर शुभमन गिल वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम दुसऱ्या स्थानावर, तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
- विराट कोहली एका स्थानाने घसरून पाचव्या क्रमांकावर आला आहे.
- श्रेयस अय्यर आठव्या स्थानावर कायम आहे.
- न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला 14 स्थानांचा फायदा झाला असून तो 14व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
- डॅरिल मिचेल सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत ICC क्रमवारीत मजबूत स्थान मिळवले आहे. गोलंदाजांमध्ये जडेजा आणि कुलदीपने चमकदार झेप घेतली, तर फलंदाजांमध्ये गिल अव्वलस्थानी कायम आहे. आता आगामी मालिकांमध्ये भारतीय खेळाडू ही लय कायम ठेवतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 बुमराहला पुन्हा ही चूक पडेल महागात! माजी प्रशिक्षकाने दिला मोठा इशारा.