Hasin Jahan Net Worth Mohammed Shami Wife Income : हसीन जहांची संपत्ती किती आहे? जाणून घ्या तिच्या कमाईचे स्त्रोत?
Hasin Jahan Net Worth 2025: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) क्रिकेटमधील कामगिरीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याची पत्नी हसीन जहां (Hasin Jahan) हिने काही वर्षांपूर्वी शमीवर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर दोघे वेगळे झाले. मात्र, आज हसीन जहां स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच एक वेगळ स्थान निर्माण करत आहे. ती कोट्यधीश असून, मॉडेलिंगसोबतच सोशल मीडियावरून मोठी कमाई करत आहे.

सोशल मीडियावर जबरदस्त फॉलोविंग, ब्रँड प्रमोशनमधून कमावते लाखो
हसीन जहां सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे 3.09 लाख, फेसबुकवर 1.46 लाख आणि X (ट्विटर) वर 4 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या मोठ्या फॉलोविंगमुळे ती विविध ब्रँड प्रमोशन्स आणि अॅक्टिंग प्रोजेक्ट्समधून मोठी कमाई करते. रिपोर्ट्सनुसार, ती प्रत्येक स्पॉन्सर्ड पोस्टसाठी हजारो ते लाखों रुपये चार्ज करते.

मोहम्मद शमी देतो दरमहा 1.3 लाख रुपये पोटगी
हसीन जहांची कमाई मोठी असली, तरी तिला वेगळे झाल्याने पतीकडून देखील आर्थिक मदत मिळते. रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शमी तिला दरमहा 1.3 लाख रुपये पोटगी (Alimony) म्हणून देतो.

शमी आणि हसीन जहांमधील वाद
हसीन जहांने (Hasin Jahan) 2018 मध्ये शमीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर दोघे वेगळे राहू लागले, मात्र अद्याप अधिकृत घटस्फोट झाला नाही. त्यांना आईरा शमी (Aira Shami) नावाची एक मुलगी आहे. विशेष म्हणजे, हसीन जहां शमीला सोशल मीडियावर फॉलो करत नाही, पण त्यांची मुलगी मात्र आपल्या वडिलांच्या पोस्ट्स लाईक करताना दिसते.
🔥 हेही वाचा 👉 Mohammed Shami Net Worth 2025: किती संपत्तीचा मालक आहे मोहम्मद शमी? जाणून घ्या त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलबद्दल.

🔴 हेही वाचा 👉 मोहम्मद शमीला मौलानांनी ठरवल गुन्हेगार, भावान दिल सडेतोड उत्तर.