Shama Mohamed Virat Kohli : शमा मोहम्मद यांची विराट कोहलीवरची पोस्ट व्हायरल, रोहित शर्मावरच्या टीकेमुळे वाढला वाद

3 Min Read
Congress Leader Shama Mohamed Virat Kohli Rohit Sharma Controversy

Congress Leader Shama Mohamed Virat Kohli Rohit Sharma Controversy : काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. रोहितच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. त्याच दरम्यान, त्यांनी केलेली विराट कोहली विषयीचा एक जुनी पोस्ट पुन्हा व्हायरल झाली आहे.  

विराट कोहलीवर केलेली पोस्ट का झाली व्हायरल?

शमा मोहम्मद यांनी २०१८ मध्ये विराट कोहलीवर (Virat Kohli) टीका करणारी एक पोस्ट केली होती. तेव्हा कोहलीने एका चाहत्याला उद्देशून म्हटले होते की, “जर तुम्हाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आवडत असतील, तर तुम्ही भारतात राहू नये.”

त्यावर प्रतिक्रिया देत शमा मोहम्मद यांनी लिहिले होते की, “विराट कोहली एक ब्रिटिशांनी निर्माण केलेला खेळ खेळतो, परदेशी ब्रँड्सची जाहिरात करून कोट्यवधी कमावतो, इटलीत लग्न करतो आणि परदेशी खेळाडूंचे कौतुक करतो. पण परदेशी फलंदाज आवडणाऱ्यांना देश सोडण्यास सांगतो!”

ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेक यूजर्स म्हणत आहेत की, “त्यांना प्रत्येक भारतीय खेळाडूशी काहीतरी समस्या आहे.”

🔴 जाणून घ्या 👉 कोण आहेत काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद? ज्या ‘रोहित शर्माला जाडा’ म्हणून आल्या चर्चेत.

रोहित शर्मावर “जाड” असल्याची टीका

भारताने न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकल्यानंतर शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसवर टीका केली. त्या म्हणाल्या, “खेळाडू म्हणून तो खूप जाड आहे! आणि अर्थातच भारताच्या इतिहासातील सर्वात कमकुवत कर्णधार आहे.”

यावर पाकिस्तानी पत्रकाराने प्रत्युत्तर देत म्हटले की, “रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.” त्यावर शमा मोहम्मद यांनी रोहितच्या आधीच्या कर्णधारांची तुलना करत त्याला “सामान्य दर्जाचा कर्णधार आणि नशिबाने मिळालेला संधीसाधू खेळाडू” असे संबोधले. 

🔴 येथे वाचा 👉 ‘रोहित शर्मा जाडा आहे त्याला…’ – काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांच्या टीकेने सोशल मीडियावर खळबळ!.

भाजपने काँग्रेसवर साधला निशाणा

या वक्तव्यांनंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, “आता काँग्रेस भारतीय क्रिकेट कर्णधारावर टीका करत आहे! मग राहुल गांधींनी क्रिकेट खेळायला हवे?”

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनीही या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, “खेळाडूंवर अशा प्रकारे टीका करणे अत्यंत लाजीरवाणे आहे. भारतीय खेळाडू देशासाठी मोठे बलिदान देतात, अशा वक्तव्यांनी त्यांचे मनोबल खचते.”

शमा मोहम्मद यांचे स्पष्टीकरण

वाद वाढल्यानंतर शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी खुलासा केला की, “मी केवळ खेळाडूच्या फिटनेसबद्दल बोलले, त्याचा अपमान करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. माझे वक्तव्य वैयक्तिक होते, त्याचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही.”

काँग्रेसने अधिकृतपणे स्पष्ट केले की, शमा मोहम्मद यांचे ट्वीट पक्षाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाही आणि त्यांना ते डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे.  

हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. एका क्रिकेटपटूच्या फिटनेसवर टीका केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण होत आहे.

🔴 हेही वाचा 👉 इंजमाम उल हक आणि सकलैन मुश्ताक भारतीय? पूर्वज होते हिंदू, कुठ राहत होते तेही सांगितल.

Share This Article