Champions Trophy 2025 PCB Reaction Final In Dubai : पाकिस्तानने तब्बल 28 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवले, मात्र ना त्यांची टीम अंतिम फेरीत पोहोचली, ना अंतिम सामना त्यांच्या भूमीत खेळला गेला. तरीसुद्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी (Mohsin Naqvi) यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनावर समाधान व्यक्त केले आहे.
PCB अध्यक्षांचा आनंद आणि गौरवाची भावना
PCB अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यशस्वी आयोजनासाठी आपल्या संघाचे आभार मानले. त्यांनी या स्पर्धेला “जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी ऐतिहासिक स्पर्धा” असे संबोधले.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव केला. या विजयासह पाकिस्तानच्या यजमानपदाखालील 8 संघांची स्पर्धा पूर्ण झाली.
भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईतच झाले, त्यात अंतिम सामन्याचाही समावेश होता.
पाकिस्तानसाठी ऐतिहासिक संधी
याआधी पाकिस्तानने 1996 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यासोबत वनडे वर्ल्ड कपच सह-यजमानपद भूषवल होत. त्यामुळे 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानसाठी महत्वाची होती.
मोहसिन नकवी यांनी X (माजी ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की,
“PCB टीम, सुरक्षादल, ICC अधिकारी आणि पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांचे आभार. पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याचा अभिमान आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही ऐतिहासिक घटना ठरली.”
🔴 हेही वाचा 👉 पाकिस्तानमध्ये होणार मोठी क्रिकेट स्पर्धा, 6 संघ घेणार सहभाग.
फायनलमध्ये PCB प्रतिनिधित्वाचा अभाव
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यांनी दुबईतील अंतिम सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात PCB किंवा पाकिस्तानच्या कोणत्याही अधिकाऱ्यांची अनुपस्थिती पाहून नाराजी व्यक्त केली.
अख्तर आणि अक्रम यांनी PCB वर टीका करत विचारल की,
“आम्ही या स्पर्धेचे यजमान होतो, मग पुरस्कार वितरण सोहळ्यात पाकिस्तानचे कोणतेही प्रतिनिधी का नव्हते?”
फायनल सामन्यानंतर ICC अध्यक्ष जय शाह यांनी विजेता कर्णधार रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफी दिली, तर BCCI अध्यक्ष रोजर बिन्नी यांनी विजेत्या संघाला ब्लेझर दिले. BCCI सचिव देवजीत सैकिया हेही त्या सोहळ्यात उपस्थित होते. मात्र, PCB चे अधिकारी किंवा प्रतिनिधी मंचावर कुठेही दिसले नाहीत.
🔴 हेही वाचा 👉 वनडे ऑलराउंडर टॉप-5 मध्ये एकमेव भारतीय.
PCB साठी प्रश्नचिन्ह?
वसीम अक्रम यांनी स्पष्ट शब्दांत PCB वर प्रश्न उपस्थित करत म्हटल की,
“PCB चे अध्यक्ष मोहसिन नकवी आजारी होते, त्यामुळे येऊ शकले नाहीत. पण अन्य अधिकारी, COO किंवा PCB चे वरिष्ठ अधिकारी तरी मंचावर का नव्हते? त्यांना आमंत्रण नव्हते का? की त्यांनी स्वतः उपस्थित राहण टाळल?”
त्यांनी असंही सांगितल की, “आम्ही यजमान असताना आमचा कोणीही प्रतिनिधी मंचावर नसण हे अयोग्य आहे. मग त्यांनी ट्रॉफी दिली नाही तरी चालेल, पण निदान PCB चे अधिकृत प्रतिनिधी म्हणून तिथे उभे राहायला हवे होते.”
पाकिस्तानच्या यजमानपदावर चर्चा कायम
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही पाकिस्तानसाठी ऐतिहासिक स्पर्धा होती, मात्र अंतिम सामना त्यांच्या भूमीत न झाल्यामुळे व पुरस्कार सोहळ्यातही त्यांच्या अधिकाऱ्यांची अनुपस्थितीमुळे PCB वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
🔴 हेही वाचा 👉 रोहित शर्मा 2027 वर्ल्ड कप खेळणार का? ICC ला दिल उत्तर.